लग्नाच्या २ दिवसांपूर्वी वराचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला; डॉक्टरकडे जातो सांगून कायमचाच गेला

रांचीतील (ranchi) सिल्ली-किता येथील रेल्वे ट्रॅकवर (Silli Kita Rail Track) तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी घडली. त्याच दिवशी या तरुणाच्या लग्नापूर्वीचे विधी सुरू होणार होते. 7 जुलैला त्यांचं लग्न (wedding) ठरलं होतं. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं.

    रांची (Ranchi).  रांचीतील (ranchi) सिल्ली-किता येथील रेल्वे ट्रॅकवर (Silli Kita Rail Track) तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी घडली. त्याच दिवशी या तरुणाच्या लग्नापूर्वीचे विधी सुरू होणार होते. 7 जुलैला त्यांचं लग्न (wedding) ठरलं होतं. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. लग्न अगदी तोंडावर आल्याने घरात तरुणाच्या नातेवाईकांची लगबग सुरू होती. कपड्यांपासून, ते पूजा विधी सर्व व्यवस्थित व्हावा म्हणून प्रत्येकजण एकमेकांना मदत करीत होते. त्यात लेकाचा मृत्यूच्या बातमीने आनंदावर विरजण पडलं.

    गावकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह पाहिला आणि त्यांनाही धक्काच बसला
    सांगितलं जात आहे की, रविवारी सायंकाळपासून अरूण बेपत्ता झाला होता. त्यामुळे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. डॉक्टरकडे जात असल्याचं सांगून अरूण घरातून बाहेर पडला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. बराच वेळ झाला तो घरी आला नाही, म्हणून कुटुंबीय चिंतेत होते. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात अरूणच्या मोबाइलचं लोकेशन सापडले. ज्यानंतर सोमवारी सकाळी रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाचा मृतदेह सापडल्याचं वृत्त समोर आलं. यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे अरुणचा मृतदेह होता.

    अरूणच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, अरूण तेथे कसा पोहोचला याबाबत काहीच कल्पना नाही. याबाबत अरूणच्या मोठ्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार करीत या प्रकरणाचा अधिक तपास करण्याची मागणी केली आहे. 7 जुलै रोजी अरूणचं लग्न होणार होते, तर 5 जुलैपासून लग्नापूर्वीचे विधी सुरू होणार होते. मात्र त्यापूर्वीच अरूणच मृतदेह सापडल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.