The ground was broken, the young man was buried inside

उमेश पासवान सकाळी शौचास जात होता. अचानक मोठा धमाका झाला आणि त्याच्या पायाखालची जमीन फाटली. उमेशच्या काही लक्षात यायच्या आत जमिनीत सामावला होता. या खड्ड्यातून धूरही निघत होता. घडलेला प्रकार पाहून आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. दृश्य इतके भयानक होते की, लोकांची घटनास्थळी जाण्याची हिंमतच होत नव्हती. दरम्यान, तेथूनच जात असलेल्या उमेश पासवानच्या भावाने हे दृश्य पाहिले तर त्यालाही धक्का बसला.

    रांची:  झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. शौचास गेलेला तरुण अचानक जमिनीत सामावला आहे. लोकांनी हा नजारा पाहिला तर त्यांचाही थरकाप उडाला. कुणालाही काही समजत नव्हते की, नेमके काय होते आहे?. लोक घटनास्थळी जाण्याची हिंमत करू शकले नाही. ही घटना धनबाद जिल्ह्याच्या केंदुआडीह भागातील आहे. इथे बीसीसीएलच्या आऊट सोर्सिंग प्रोजेक्टच्या शेजारी तरुण जिवंत जमिनीत गाडला गेला.

    असे सांगितले गेले की, इथे राहणारा तरुण उमेश पासवान सकाळी शौचास जात होता. अचानक मोठा धमाका झाला आणि त्याच्या पायाखालची जमीन फाटली. उमेशच्या काही लक्षात यायच्या आत जमिनीत सामावला होता. या खड्ड्यातून धूरही निघत होता. घडलेला प्रकार पाहून आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. दृश्य इतके भयानक होते की, लोकांची घटनास्थळी जाण्याची हिंमतच होत नव्हती. दरम्यान, तेथूनच जात असलेल्या उमेश पासवानच्या भावाने हे दृश्य पाहिले तर त्यालाही धक्का बसला.

    भावाला वाचवण्यासाठी तो त्याच्याकडे धावत गेला. भावाला खड्ड्यातून काढण्यासाठी तो धडपड करत राहिला. एका भावाला दुसऱ्या भावाचा जीव वाचवण्यासाठी धडपडताना पाहून इतरही काही लोक तिथे आले. मोठ्या प्रयत्नांनंतर खड्ड्यात गाडल्या गेलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले. पण तो गंभीरपणे भाजलेला होता. त्याला लगेच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.