लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिरसारख्याच लोकांचा हात; भाजपा खासदाराची मुक्ताफळे

लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात आहे, हे देशाचे दुर्भाग्य आहे, असे वक्तव्य मध्यप्रदेशचे भाजपा खासदार सुधीर गुप्ता यांनी केले आहे. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता 2 मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाही आहे. मात्र, दादा आमिर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

    भोपाळ : उत्तरप्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वातील भाजपा सरकारने तेथे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या नव्या कायद्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. देशभरात वाढती लोकसंख्या पाहता कठोर कायदा करण्याची मागणी होत आहे. त्यातच आता भाजपा खासदारने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.