रुग्णालयच अस्तित्वात नाही; मग कोविशिल्डचे 10 हजार डोस कुणी बुक केले?

सीरम इन्स्टिट्यूटला 10 हजार कोविशिल्ड लसींची ऑर्डर देणाऱ्या एका रुग्णालयाचा शोध जबलूपरमधील आरोग्य विभाग घेत आहे. ज्या रुग्णालयाने कोविशिल्डच्या 10 हजार लसींची ऑर्डर दिली ते रुग्णालय जबलपूरमध्ये नसल्याचा दावाच विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 25 मे रोजी सीरमला मध्यप्रदेशातील सहा खासगी रुग्णालयांनी कोविशिल्डची ऑर्डर दिली होती. यात भोपाळ, ग्वाल्हेर आणि जबलपूरमधील प्रत्येकी एका रुग्णालयाचे तर इंदूरमधील तीन रुग्णालयांची नावे होती.

  जबलपूर : सीरम इन्स्टिट्यूटला 10 हजार कोविशिल्ड लसींची ऑर्डर देणाऱ्या एका रुग्णालयाचा शोध जबलूपरमधील आरोग्य विभाग घेत आहे. ज्या रुग्णालयाने कोविशिल्डच्या 10 हजार लसींची ऑर्डर दिली ते रुग्णालय जबलपूरमध्ये नसल्याचा दावाच विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 25 मे रोजी सीरमला मध्यप्रदेशातील सहा खासगी रुग्णालयांनी कोविशिल्डची ऑर्डर दिली होती. यात भोपाळ, ग्वाल्हेर आणि जबलपूरमधील प्रत्येकी एका रुग्णालयाचे तर इंदूरमधील तीन रुग्णालयांची नावे होती.

  आरोग्य विभागाला आदेश

  जबलूपरमधील मॅक्स हेल्थ केयर नामक रुग्णालयाने सीरमला 10 हजार कोविशिल्ड लसींची ऑर्डर दिली होती. एवढ्या मोठ्या संख्येत लशींची ऑर्डर मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या कोल्ड स्टोअरेज क्षमतेच्या तपासणीसाठी भोपाळ मुख्यालयातून जबलपूर आरोग्य विभागाला आदेश प्राप्त झाले. या आदेशानंतर लसीकरण अधिकारी रुग्णालयाची माहिती घेऊ लागले खरे परंतु शोधूनही त्यांना रुग्णालच काय साधे क्लिनिकही सापडले नाही.

  शोध सुरूच

  रुग्णालयच न सापडल्याने लसीकरण अधिकाऱ्यांनी त्याची माहिती भोपाळ मुख्यालयाला पाठवून दिली. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लशींची ऑर्डर देणाऱ्या रुग्णालयाने चुकीचा पत्ता का दिला याचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे, सीरममधून लशी रवाना झाल्या की नाही याची पुष्टी मात्र झाली नाही. दरम्यान त्यांच्या माहितीअभावी शहरातील कोणतेही खासगी रुग्णालय लसीकरण करू शकत नाही, असा दावाही अधिकाऱ्याने केला आहे. आता सीरमद्वारेही या रुग्णालयाची माहिती एकत्रित केली जात असल्याचे समजते.

  हे सुद्धा वाचा