The husband nodded, not even taking a selfie; Strange excuses for wives to divorce

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये असणारी महिला अगदी शुल्लक कारण घेऊन घटस्फोटाची मागणी करण्यासाठी कोर्टात पोहोचली. पती माझ्यासोबत सेल्फी घेत नाही त्यामुळे ही पत्नी नाराज आहे.

    मेरठ : पत्नीला जेवण बनवता येत नाही किंवा पत्नीला घोरण्याची सवय आहे, म्हणून पतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे आपण ऐकले असेल. मात्र एक उलटेच प्रकरण समोर आले आहे. नवऱ्याच्या डोक्यावर एकही केस नसल्याने तसेच नवरा माझ्यासोबत सेल्फीही घेत नसल्याचे कारण देत कोर्टात अर्ज दाखल करून घटस्फोची मागणी केली आहे.

    उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये असणारी महिला अगदी शुल्लक कारण घेऊन घटस्फोटाची मागणी करण्यासाठी कोर्टात पोहोचली. पती माझ्यासोबत सेल्फी घेत नाही त्यामुळे ही पत्नी नाराज आहे.

    पतीने मात्र पत्नीचा हा दावा फेटाळून लावला. पतीने पत्नीसोबतचे सेल्फीचे फोटो कोर्टात सादर केले. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना दोघांचे समूपदेशन करण्याचा सल्ला दिला.

    एसआय मोनिका जिंदाल यांनी सांगितले, कोर्टाच्या आदेशावरून आम्ही दोघांचे समूपदेशन केले. पती आणि पत्नीची बाजू शांतपणे ऐकून घेतली. पवित्र नात्याचे महत्तव दोघांना समजावून सांगितले. अखेर दोघांचे समूपदेशन केल्यानंतर प्रकरण शांत झाल्याचेही जिंदाल यांनी सांगितले आहे.