भूस्खलनामुळे डोंगराचा काही भाग घरावर कोसळला; एका महिला क्रिकेटपटूचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे (Heavy rain)  भूस्खलन (Landslide) होऊन डोंगराचा काही भाग घरावर ( Mountain collapse on the house)  कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही दुर्घटना मेघालयमधील (Meghalaya) पूर्व खासी या डोंगराळ जिलह्यात घडली.

शिलाँग: मुसळधार पावसामुळे(Heavy rain)  भूस्खलन (Landslide) होऊन डोंगराचा काही भाग घरावर ( Mountain collapse on the house)  कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही दुर्घटना मेघालयमधील (Meghalaya) पूर्व खासी या डोंगराळ जिलह्यात घडली. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा मोठा भाग तुटून त्याखाली अनेक घरे दबली गेली. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील एका महिला क्रिकेटपटूचा मृत्यू (Death of a female cricketer) झाला आहे. तर पाच अन्य व्यक्ती बेपत्ता (Five other people are missing) आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना काल शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पूर्व खासी जिल्ह्यातील मावनेई भागात घडली. या दुर्घटनेत राष्ट्रीय स्तरावर मेघालयचे प्रतिनिधित्व केलेल्या ३० वर्षीय रझिया अहमदचा मृत्यू झाला असून तिचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे. मात्र, पाच अन्य व्यक्ती अजूनही बेपत्ता आहेत. सध्या पोलीस आणि होमगार्डच्या पथकाकडून बचाव अभियान सुरू आहे.

रझिया अहमद २०११-१२ पासून राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करत होती. बीसीसीआयने गतवर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये ती मेघालयकडून सहभागी झाली होती. असे मेघालय क्रिकेट असोसिएशनचे महासचिव गिडिओन खारकोंगोर यांनी सांगितले. तसेच रझियाच्या संघातील सहकाऱ्यांनीही तिच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.