एकाच मुलीवर जडला दोन भावांचा जीव अन्…पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

महेंद्र आणि देवराज गुर्जर अशी या दोघांची नावे असून ते २३ वर्षांचे होते. हे दोघे दाबलाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केशवपुरा गावचे रहिवासी होती. दोघांनी भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.

    दोघेही भाऊ  एकाच मुलीच्या प्रेमात पडलेले होते. परंतु दोघांनीही आत्महत्या केल्याची घटना राजस्थानातील बुंदी जिल्ह्यात घडली आहे. हे दोघेजण चुलत भाऊ असून दोघांची वयेही सारखीच आहेत. महेंद्र आणि देवराज गुर्जर अशी या दोघांची नावे असून ते २३ वर्षांचे होते. हे दोघे दाबलाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या केशवपुरा गावचे रहिवासी होती. दोघांनी भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.

    दाबलाणाच्या पोलीस निरीक्षकांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की गुडला गावाजवळ या दोघांचे मृतदेह सापडले आहेत. दोघांच्याही हातावर ‘आशा’ नाव गोंदवलेलं होतं. यावरून दोघेजण एकाच मुलीच्या प्रेमात पडले असावेत असा पोलिसांना दाट संशय होता. दोघांचे मोबाईल तपासले असता त्यांना त्यात मिळालेले फोटो, मेसेज पाहिल्यानंतर त्यांचा संशय खरा ठरला. या दोघांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.