Surendra Singh, BJP MLA

उत्तर प्रदेशच्या बैरिया मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी संतापजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सरकार बलात्काराविरोधात तलवार घेऊन पाठीशी उभे राहील परंतु हे मुलीच्या आई वडिलांचे कर्तव्य आहे की, त्यांनी मुलींवर चांगले संस्कार दिले पाहिजे.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील हाथरस (Hathras Gang rape) येथे सामूहिक बलात्कार (Rape) आणि त्यानंतर १९ वर्षांच्या मुलीच्या मृत्यू नंतर संपूर्ण राष्ट्र संतप्त आहे. देश आणि संपूर्ण विरोधक पीडितेच्या कुटूंबासाठी न्यायासाठी सतत मागणी करत आहेत. दरम्यान, शनिवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. तर दुसरीकजे भाजप आमदाराने धक्कादायक वक्तव्य केले आहे. मुलींवर संस्कार केल्यावर ( educate girls) बलात्काराचे प्रमाण कमी होईल असे विधान भाजप आमदार (BJP MLA) सुरेंद्र सिंह यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशच्या बैरिया मतदारसंघाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी संतापजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सरकार बलात्काराविरोधात तलवार घेऊन पाठीशी उभे राहील परंतु हे मुलीच्या आई वडिलांचे कर्तव्य आहे की, त्यांनी मुलींवर चांगले संस्कार दिले पाहिजे. त्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे. तेव्हाच देशात बलात्काराच्या घटना संपुष्टात येथील. जसे सुरक्षा पुरविणे सरकारचे काम आहे. तसेच मुलीवर चांगले संस्कार देणे आई-वडिलांचे काम आहे. यामुळे देश सुंदर बनेल. असे वक्तव्य आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे.