…तर तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही, ८ डिसेंबरपासून आदेश जारी

दिल्ली : ८ डिसेंबरपासून देशात नविन नियम लागू होणार आहे.  हेल्मेट नसेल तर देशातील पेट्रोल पंपावर पेट्रोल  दिले जाणार नाही.

हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचा नियम आधीपासून देशात लागू आहे. मात्र, असं असलं तरी अनेक लोक याकडे दुर्लक्षित करताना दिसतात. हेच लक्षात घेऊन आता यासंबंधितील नियम आणखी कठोर  करण्यात आले आहेत.

कोलकाता मध्ये आता हेल्मेटशिवाय पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे.  हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याचा नियम पुन्हा लागू करण्यात आला असल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली.

दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातल्यास अपघातांमध्येही घट होईल.  लोकांमध्ये हेल्मेट विषय जागरूकता निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’, नियम ८ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचं कोलकाता पोलिसांनी सांगितलं आहे.