कुख्यात गुंड विकास दुबेच्या पत्नीने केला होता ‘हा’ घोटाळा, लवकरच अटक होण्याची शक्यता

विकास दुबेची (Vikas Dubey) पत्नी रिचा दुबे हीने बनावट आधार कार्डवरून (fake Aadhaar card) सिम ( SIM ) विकत घेतलं होतं. या आरोपावरून तिच्याविरोधात अहवाल दाखल करण्यात आला. आरोपपत्र लागू होईपर्यंत रिचा दुबेने कोर्टाकडे अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती, जो कोर्टाने (Court) फेटाळून लावला आहे.

कानपुर: चौबेपुर परिसरातील चर्चित बिकरू (Bikru) गावात पोलीस चकमकित मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे (Vikas Dubey) यांच्या पत्नीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास दुबेची (Vikas Dubey) पत्नी रिचा दुबे हीने बनावट आधार कार्डवरून (fake Aadhaar card) सिम ( SIM ) विकत घेतलं होतं. या आरोपावरून तिच्याविरोधात अहवाल दाखल करण्यात आला. आरोपपत्र लागू होईपर्यंत रिचा दुबेने कोर्टाकडे अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती, जो कोर्टाने (Court) फेटाळून लावला आहे. विकास दुबेसाठी खास असलेल्या गुडान त्रिवेदी यांच्या पत्नीलाही जामीन नाकारण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी दोन्ही अर्जांवर सुनावणी झाली. सुनावणीनंतर (Hearing) दोन्ही आरोपींना निकालामध्ये कोर्टाकडून दिलासा (Not Relief From The Court) मिळाला नाही.

एसआयटीच्या अहवालानंतर झाली एफआयआर

एसआयटीने दिलेल्या अहवालानुसार, विकास दुबेच्या मित्र परिवारांनी देखील बनावट सिमकार्ड बनवून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याचं काम केलं होतं. या आरोपींमध्ये विकास दुबेच्या पत्नीसोबत ८ पारवाने ग्राहक आणि ९ बनावटी सिमकार्ड घेणाऱ्यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते.

या लोकांवर बनावट सिम असल्याचा आरोप

बनावट सिम वापरल्याच्या आरोपाखाली विकास दुबेची पत्नी रिचा दुबे, रामसिंग,मोनू, शिव तिवारी उर्फ आशुतोष त्रिपाठी, शांती देवी, या घटनेत सहाय्य करणारी खुशी, अमर दुबे यांची पत्नी खुशी, रेखा अग्निहोत्री, सहकारी विष्णुपाल उर्फ जिल्हादार आणि विकास दुबेचा भाऊ दीपक उर्फ दीपप्रकाश यांचा सुद्धा सहभाग होता.