देशात Black Fungus चे थैमान, तब्बल ११ हजार ७१७ इतक्या रूग्णांची नोंद

हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात 25 मे 2021 रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली –  देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे.

    हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात 25 मे 2021 रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंतची आकेडवारी देण्यात आली आहे.

    देशामध्ये आतापर्यंत एकूण 11 हजार 717 जणांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण हे गुजरात आणि महाराष्ट्रामधील असल्याचं दिसून आलं आहे. ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गुजरातमध्ये 2859, महाराष्ट्रात 2770, आंध्र प्रदेशमध्ये 768, मध्य प्रदेश 752, तेलंगणा 744, उत्तर प्रदेश 701 आणि राजस्थानमध्ये 492 ब्लॅक फंगसच्या रुग्णांची नोंद झाली आहे.