गोव्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या पार

गोव्यात कोरोना रूग्णांचा (Corona Virus) आकडा दिवसागणिक वाढत आहे. गोवा (Goa State) राज्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या वर गेली आहे. त्यापैकी ३५ हजार रूग्ण कोरोनामुक्त (Discharge) झाले आहे. तर ५२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death) झाला आहे.

 पणजी : गोव्यात कोरोना रूग्णांचा (Corona Virus) आकडा दिवसागणिक वाढत आहे. गोवा (Goa State) राज्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या वर गेली आहे. त्यापैकी ३५ हजार रूग्ण कोरोनामुक्त (Discharge) झाले आहे. तर ५२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Death) झाला आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत राज्यात सक्रिय (Active) कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ७१६ होती. त्याआधी ५ रोजी सक्रिय रुग्ण संख्येने ४८०३ होती. दर चोवीस तासांत सुमारे चारशे कोरोनाग्रस्त आजारातून बरे होत आहेत.

सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात ४० हजार लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. साखळीत १९९, डिचोलीत १०२, पेडणोत १०७, म्हापसा येथे २३५, पणजी २१४ व मयेत सध्या २८ कोविडग्रस्त आहेत. फोंडा भागात सुद्धा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.