कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर PM मोदींऐवजी आता CM ममता बनर्जींचा फोटो दिसणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या लस धोरणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतात. तसेच सर्व लोकांना मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात सीएम ममता बॅनर्जी यांनी मुख्य मंदिरातील पुजार्‍यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिलेत. आता तिसर्‍या टप्प्यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहायला मिळायचे, परंतु आता लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत.