The police were also shocked to see the glory of the 12-year-old boy; 278 transactions in 3 months for the purchase of online game weapons

3.22 लाखांचा फटका बसलेल्या शुभ्रा पाल या व्यवसायाने शिक्षिका आहेत. त्यांच्या बँक खात्यातून 8 मार्च ते 10 जून दरम्यान 278 वेळा ट्रान्जेक्शन झाले. 11 जून रोजी त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. विशेष म्हणजे पैसे काढण्यासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एकही ओटीपी आला नव्हता. ठगबाजांनी पैसे लुटण्यासाठी नवी शक्कल लढविल्याने पोलिसही अचंभित झाले आहेत.

  रायपूर : कोरोनाकाळात सध्या मुलांचे शिक्षण ऑनलाईनच होत असल्यामुळे मुलेही मोबाईलच्या अधीन झाले आहेत. त्यातच ऑनलाईन गेमिंगचा फंडाही जोरात सुरू असून त्याचीही सवय लहानमुलांना जडली आहे. परंतु हीच सवय आता मुलासह कुटुंबीयांनाही भारी पडू लागली आहे. कारण छत्तीसगडमधील काँग्रेर यथील एका महिलेला तीन महिन्यात 3.22 लाख रुपयांची रक्कम गमवावी लागली. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रारही केली. तपासाअंती पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. त्यात महिलेच्याच 12 वर्षाच्या मुलाने या गेममध्ये वापरात येणारे शस्त्रे खरेदी केले होते.

  मोबाईलवर ओटीपीच नाही

  3.22 लाखांचा फटका बसलेल्या शुभ्रा पाल या व्यवसायाने शिक्षिका आहेत. त्यांच्या बँक खात्यातून 8 मार्च ते 10 जून दरम्यान 278 वेळा ट्रान्जेक्शन झाले. 11 जून रोजी त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. विशेष म्हणजे पैसे काढण्यासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एकही ओटीपी आला नव्हता. ठगबाजांनी पैसे लुटण्यासाठी नवी शक्कल लढविल्याने पोलिसही अचंभित झाले आहेत.

  ‘फ्री फायर’ने पैसे फुर्र…

  दरम्यान, पोलिसांनी विस्तृत चौकशी केली असता, बँकेत असलेल्या खात्यातून व लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच रुपयांचे ट्रान्जेक्शन झाल्याचे उघड झाले. या रुपयांचा वापर ऑनलाईन गेम खेळण्यासाठी आणि गेमिंग लेव्हल अपग्रेड करण्यासाठी करण्यात आला होता. या मोबाईलचा वापर त्यांचा मुलगा करीत होता आणि तो ‘फ्री फायर’ हा गेम सातत्याने खेळत होता. त्याचीही पोलिसांनी चौकशी केली असता, खरा प्रकार उघडकीस आला.

  अनेक मुलांना जडले व्यसन

  चौकशी दरम्यान, परिसरातीलच अनेक मुले या गेमच्या नादी लागले असल्याचेही उघड झाले आहे. त्यापैकी कित्येकांनी तर ऑनलाईन शस्त्रेही खरेदी केली आहेत. तथापि, मुलांनी कोणाच्या तरी आमिषाला बळी पडून असला प्रकार केला असावा, असा आरोप कुटुंबीयांचा आहे. मुलेही घरातून मिळालेला पॉकेट मनी आणि रुपये चोरी करून खर्च करीत आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधाच नाही ते अन्य मुलांना खरेदी करण्यासाठी पैसेही देत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

  समुपदेशन आवश्यक

  कोरोनामुळे खरेदी, पेमेंटसह शिक्षणही ऑनलईन सुरू आहे त्यामुळे मुलेही मोबाईलचा अवास्तव वापर करीत आहेत. मुलांना मोबाईलवर ऑनलाईन सुविधेची संधी देतानाच त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांची माहिती देणे आवश्यक आहे. मुले जेव्हा मोबाईलचा वापर करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  ऑनलाईन असलेल्या मुलांना बँक खात्याची माहिती देणे टाळावे. मोबाईलवर मुले कोणता गेम खेळतात याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना असणे गरजेचे आहे. मुलांना स्वत:समोरच ऑनलाईन सुविधेचा वापर करू दिल्यास उत्तम.