वीज वितरण कंपनीला ‘या’ कारणासाठी न्यायालयाने फटकारले

लाईनमनची नोकरी नाकारणाऱ्या तेलंगणातील वीजवितरण कंपन्यांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे

हैद्राबाद: विजेच्या खांबावर महिला (woman) चढू शकत नसल्याने त्यांना लाईनमनची नोकरी(job) नाकारणाऱ्या तेलंगणातील (telangana) वीजवितरण कंपन्यांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने वीज वितरण कंपन्यांना याबाबत महिलांची परीक्षा घेऊन सत्यता पडताळण्यास सांगितले. दोन महिलांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात दाखल केलेल्या खटला दाखल केला होता.

या खटल्यावर सुनावणी करताना चीफ जस्टिस राघवेंद्र सिंह चौहान व जस्टिस बी विजयसेन रेड्डी यांनी कंपन्यांना फटकारले आहे. जर सशस्त्र सेनेमध्ये संधीचे महिलांसाठी दरवाजे उघडले आहे आणि तुम्ही केवळ महिला आहे यावरून संधी कशी काय नाकारू शकता अशी विचारणाही त्यांनी केले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या वीज वितरण कंपन्यांनी सुरुवातीला महिलांना ३३ टक्के आरक्षणासह नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु २०१९ मध्ये हे आरक्षण हटवण्यात आले. महिलांच्या बाजूने खटला चालवणारऱ्या वकिलांच्या म्हणण्यानुसार या वीज वितरण कंपन्याने २०१८ मध्ये १५०० , २०१९ मध्ये २५०० महिलांसाठीच्या रिक्त जागांसाठीची भरती काढली होती. पुढील दोन आठवड्यात आतमध्ये विजेच्या खांबावर चढण्याच्या परीक्षांचे आयोजन करण्याचे आदेश ही न्यालयाने दिले आहेत.