The prowess of an 11-year-old ‘teacher’; The school started in the village itself

लहान मुलांना काहीच समजत नाही किंवा अत्यंत कमी समजते, अशी मोठ्यांची समजूत असते. ती खोटी ठरवण्याचा पराक्रम एका 11 वषीय बालिकेने केला आहे. कोरोनाकाळात शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अक्षरशः हाल होत आहेत. हे पाहून स्वतः विद्यार्थिनी असणारी ही बालिका आपल्यापेक्षा छोट्या वयाच्या विद्यार्थ्यांची शिक्षिका बनली आहे. ही बालिका आदिवासी समाजातील असून तिचे नाव दीपिका मिनज असे आहे.

    ती स्वतः सातव्या इयत्तेत शिकते. झारखंड राज्यातील खुंटी या जिल्ह्यातील चंदापारा गावात तिची शाळा आहे. लॉकडाऊन काळात तिने एक सामाजिक उपक्रम या नात्याने आपल्यापेक्षा खालच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य सुरू केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून तिने गावातच आपली स्वतःची शाळा सुरू केली.

    तिचे हे अचाट काम पाहून ग्रामसभेने आणखी काही ज्येष्ठ विद्यार्थ्यांना तयार केले व त्यांच्या माध्यमातून खालच्या इयत्तातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले. दीपिकाचे शिकविण्याचे अनुभव अनोखे आहेत. खालच्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकेही वाचता येत नाहीत, हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने प्रथमपासून शिकविण्यास प्रारंभ केला. स्वतः ती इंग्रजी, गणित इत्यादी अवघड मानले गेलेले विषयही लिलया शिकविते. याबद्दल जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

    ……