प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

रुग्णालयातील अग्नी सुरक्षेवरून सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला फटकारले आहे. गेल्या वर्षी राजकोटमधील एका कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपळून रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कोर्टाने 18 डिसेंबरला राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि त्या संदर्भातील उपाययोजना करण्यास सांगितले होते.

    दिल्ली : रुग्णालयातील अग्नी सुरक्षेवरून सुप्रीम कोर्टानं गुजरात सरकारला फटकारले आहे. गेल्या वर्षी राजकोटमधील एका कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपळून रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कोर्टाने 18 डिसेंबरला राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट आणि त्या संदर्भातील उपाययोजना करण्यास सांगितले होते.

    उपाययोजना करण्यासाठी जून 2022 पर्यंतचा अवधी देण्यात आला होता. मात्र त्यावर कोणतीच अंमलबजावणी झाली नसल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. असेच सुरू राहिले तर लोकं जळून मरत राहतील, असे परखड मतही कोर्टाने नोंदवले आहे. त्यात सरकारने अधिसूचना जारी केल्याने सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला आहे.