The rats in the lockdown also became alcoholics; Reached 12 bottles of liquor

सरकारी दुकानातील दारूच्या 12 बाटल्या उंदरांनी रिकाम्या केल्या आहेत. तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कदमपुझा परिसरातील लॉकडाऊनपासूनच बंद असलेले दारूचे दुकाने उघडल्यानंतर ही बाब समोर आली. दुकान उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहिले की दारूच्या 12 बाटल्यांचे झाकण उघडलेले आहे आणि या बाटल्या पूर्णपणे रिकाम्या झालेल्या आहेत.

    बंगळुरू : लॉकडाऊनदरम्यान अशा अनेक तळीरामांच्या बातम्या किंवा व्हीडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यांची दारू न मिळाल्याने वाईट अवस्था झाली आहे. परंतु एक अशी घटना घडली आहे ज्यात चक्क उंदरांनाच दारूचे व्यसन लागल्याचे समोर आले आहे. ही घटना तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील गुडालूर शहरातील आहे.

    या घटनेत सरकारी दुकानातील दारूच्या 12 बाटल्या उंदरांनी रिकाम्या केल्या आहेत. तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कदमपुझा परिसरातील लॉकडाऊनपासूनच बंद असलेले दारूचे दुकाने उघडल्यानंतर ही बाब समोर आली. दुकान उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहिले की दारूच्या 12 बाटल्यांचे झाकण उघडलेले आहे आणि या बाटल्या पूर्णपणे रिकाम्या झालेल्या आहेत.

    या बाटल्यांवर उंदरांच्या दातांच्या खुणा आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच राज्य विपणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासात असे समोर आले की दुकानातील उंदरांनीच हे काम केले आहे. या दारूच्या बाटल्यांची किंमत सुमारे 1500 असल्याचे सांगितले जात आहे.