जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जितिन प्रसाद यांच्या भाजपामध्ये प्रवेश करण्यावर टीका करतानाच त्यांनी पक्षनेतृत्वालाही सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. दुसऱ्यांचं ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही. कॉर्पोरेट व्यवस्था देखील जगू शकत नाही. राजकीय पक्षांचं देखील तसंच आहे. तुम्ही जर ऐकलं नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत. 

    काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असून ज्योतिरादित्य सिंदिया, जितिन प्रसाद यांच्यानंतर आता सचिन पायलट यांचा नंबर लागणार का? अशी देखील विचारणा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षाला सूचक इशारा दिला आहे.

    जितिन प्रसाद यांच्या भाजपामध्ये प्रवेश करण्यावर टीका करतानाच त्यांनी पक्षनेतृत्वालाही सूचक शब्दांमध्ये इशारा दिला आहे. दुसऱ्यांचं ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही. कॉर्पोरेट व्यवस्था देखील जगू शकत नाही. राजकीय पक्षांचं देखील तसंच आहे. तुम्ही जर ऐकलं नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत.

    कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत. “मला खात्री आहे की नेतृत्वाला हे माहितीये की नेमकी समस्या काय आहे. माझी आशा आहे की नेतृत्व लोकांचं ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही.

    काँग्रेसनं पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवं. त्यासाठी आपल्याला पुनर्रचना करणं आवश्यक आहे. जर प्रमुखाने ऐकणंच सोडून दिलं, तर संघटना कोसळेल. आम्हाला फक्त इतकंच हवं आहे की पक्षानं आमचं ऐकावं, असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत.