The remains of a 1200-year-old town beneath the mountains; Archaeological excavations will be carried out

    ग्वाल्हेर : मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर शहरानजीक नरेश्वर भागात असलेल्या डोंगरांदरम्यान 1200 वर्षे जुन्या नगराच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. येथील मातीच्या ढिगाऱ्यांखाली 14-15 फूट उंचीच्या दोन मजली घरांचे अवशेष आहेत. यात रसद आणि मौल्यवान सामान सुरक्षित ठेवण्यासाठी भिंतींमध्येच तिजोरीवजा गुप्त स्थान आणि छतावर जाण्यासाठी जिना दिसून येतो.

    नगरात ये-जा करण्यासाठी प्रवेशद्वारही तयार करण्यात आले होते. येथील दोन स्तंभ दिसून येतात. तेथे 4 फूट रुंद सुरक्षाभिंत आहे. तेथे तलावाचीही निर्मिती करण्यात आलेली आहे. 1996-97 मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाने मुरैना जिल्ह्यातील कुंतलपूर येथे उत्खनन केले असता महाभारतकालीन अवशेष मिळाले होते.

    2005 मध्ये बटेश्वरमध्ये ऐतिहासिक मंदिर सापडले होते. नरेश्वरचे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. तेथे जुन्या घरांचे अवशेष सापडले असल्यास सर्वेक्षणासाठी पथक पाठविण्यात येईल अशी माहिती पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली आहे.