भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पाकिस्तानी ठरवले असते आणि… महबुबा मुफ्तींचा भाजपाला टोला

    श्रीनगर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते, तर भाजपाने त्यांनाही पाकिस्तानसमर्थक ठरवून बदनाम केले असते, अशी टीका पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी केली. कलम 370 बाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांना समर्थन देत त्यांनी टीकाकारांना टोला लगावला.

    आज जर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर भाजपाने त्यांनाही पाकिस्तान समर्थक ठरवले असते. कलम 370 ला आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाने मान्यता दिली होती. परंतु, केंद्राने हा कलम रद्द केला असा आरोप महबुबा मुफ्ती यांनी केला.

    हे सुद्धा वाचा