लॉकडाऊनमध्ये पैशांची गरज होती; पित्याने असा निर्णय घेतला की…

कोरोना संकट काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पैशाची अडचण होती. ही गरज भागवण्यासाठी वडिलांनी आपल्या 14 वर्षीय मुलीचे फक्त 6000 रुपयांत 32 वर्षीय व्यक्तीशी लग्न लावून दिले.

    चमोली : लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पैशाची चणचण भागवण्यासाठी पित्याने आपल्या पोटच्या मुलीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडच्या चमोलीमध्ये घडली आहे.

    कोरोना संकट काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पैशाची अडचण होती. ही गरज भागवण्यासाठी वडिलांनी आपल्या 14 वर्षीय मुलीचे फक्त 6000 रुपयांत 32 वर्षीय व्यक्तीशी लग्न लावून दिले.

    ज्या व्यक्तीने मुलगी विकत घेतली, तो दररोज मद्यपान करून मुलीला मारहाण आणि तिच्यावर बलात्कार करत होता.
    लाकडाऊननंतर शाळा सुरू झाल्यानंतर ही विद्यार्थिनी शाळेत येत नव्हती. शिक्षक थेट या मुलीच्या घरी पोहोचले. यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

    गावातल्या एका मध्यस्थीने मुलीच्या पालकांची फसवणूक करून त्यांची मुलगी सहा हजार रुपयांत विकली होती. मुलीच्या वडिलांनी कबूल केले की लॉकडाऊनमध्ये आपल्याला पैशांची गरज आहे, म्हणून त्यांनी आपल्या मुलीला विकल्याची कबुली दिली.