The stage broke in the reception ceremony in bihar MLA fell on the ground

बिहारमध्ये पुन्हा एकदा सभेसाठी तयार करण्यात आलेले एक व्यासपीठ कोसळण्याचा प्रकार घडला. ही घटना चंपारण जिल्ह्यात घडली. येथील सुगौली गावात आमदारांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हे व्यासपीठ जमिनीवर कोसळले. या घटनेत आमदार जखमी झाले आहेत.

मोतीहारी : बिहारमध्ये पुन्हा एकदा सभेसाठी तयार करण्यात आलेले एक व्यासपीठ कोसळण्याचा प्रकार घडला. ही घटना चंपारण जिल्ह्यात घडली. येथील सुगौली गावात आमदारांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हे व्यासपीठ जमिनीवर कोसळले.

या घटनेत आमदार जखमी झाले आहेत. सुगौली विधानसभेचे राजद आमदार शशिभूषण सिंह यांचा ग्रामस्थांनी नागरी सत्कार आयोजित केला होता. आमदारांच्या स्वागतासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. व्यासपीठावर फुले व बलून यांनी सजावट केली होती.

आमदार व्यासपीठावरर दाखल होताच गावातील मुलींनी आमदाराचे स्वागतगीत सुरू केले. आमदारांचे स्वागत सुरू असतानाच एकाच क्षणात व्यासपीठ खाली कोसळले आणि व्यासपीठावरील सर्वच जण जमिनीवर पडले.

नेते खाली पडताच त्यांच्यावर खुर्ची व साउंड बॉक्सही पडले. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर कार्यक्रम स्थगित करण्यात आला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी व्यासपीठावर आमदारांसह तीन डझन नेते होते. काही किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.