डीएनएबाबतचे वक्तव्य व यूपी सरकारच्या कारभारावरुन जगद्गुरु रामभद्राचार्यांनी फटकारले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख मोहन भागवत हे दोन दिवशीय चित्रकूट दौऱ्यावरमध्ये आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी तुळशीपीठाच्या आश्रमात पद्म विभूषण जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांची भेट घेतली. यामध्ये सुमारेदीड तास ही बैठक सुरु होती.

    चित्रकूट: ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत(Mohan Bhagwat)  यांचे हिंदू-मुस्लिम यांच्याबाबत डी एन ए बाबत केलेले वक्तव्य अनुकूल नसल्याचे मत जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी केले आहे.  इतकेच नव्हे तर नुकत्याच उत्तर प्रदेशात (UP government) झालेल्या योगी सरकार आणि जिल्हा पंचायत निवडणुकांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकारची कामे चांगली नसून योगी सरकारचे कार्य फक्त सोशल मीडियापुरते मर्यादित आहे. यासगळ्याच्या सर्वसामान्य जनतेला फायदा होत नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. मी येथील जिल्हा पंचायतीत समाधानी नाही. पण, यूपीमध्ये पुन्हा भाजपचे(BJP) सरकार स्थापन होईल. असेही ते म्हणाले आहेत.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख मोहन भागवत हे दोन दिवशीय चित्रकूट दौऱ्यावरमध्ये आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी तुळशीपीठाच्या आश्रमात पद्म विभूषण जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांची भेट घेतली. यामध्ये सुमारेदीड तास ही बैठक सुरु होती.

    मागच्या काही दिवसापूर्वी गाझियाबादमध्ये मोहन भागवत म्हणाले होते की, ‘एखादा हिंदू इथे मुस्लिम राहू शकत नाही असे जेव्हा एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. सर्व भारतीयांचे डीएनए एकाच असून, कुणालाही धर्माकडे दुर्लक्ष करता येणार नाही.