अनोखा चष्मा; मागील दृश्य पाहण्यासाठी दोन अतिरिक्त लेन्स

चष्मा असेल तर दृश्य स्पष्ट दिसतात, असे आपण नेहमीच बोलतो. पण आता याच विचाराला प्रगत करत पश्चिम बंगालच्या पूर्व बुर्द्धमान जिल्ह्याच्या एका विद्यार्थिनीने हे सिद्ध केले आहे की, चष्मा खास असेल तर आपण मनोइच्छित दृश्य पाहू शकतो. इयत्ता 12वीत असलेल्या दिगंतिका बोस हिने एक अनोखा चष्मा बनविला आहे, ज्यामुळे आपण मान न वळवता पाठीमागील दृश्यदेखील पाहू शकतो. परंतु असे चष्मे प्रयोगात व प्रचलनात येण्यासाठी या चष्म्यांना चाचण्यांमधून जावे लागेल. मेमारी येथील व्हीएम इन्स्टिट्युटच्या युनिट 12ची विद्यार्थिनी दिगंतिका बोसने सांगितले की तिने आपल्या कल्पनाशक्तीने हा चष्मा तयार केला आहे.

  • विद्यार्थिनीने फक्त १०० रुपयांत बनविला अनोखा चष्मा

दुर्गापूर (Durgapur).  चष्मा असेल तर दृश्य स्पष्ट दिसतात, असे आपण नेहमीच बोलतो. पण आता याच विचाराला प्रगत करत पश्चिम बंगालच्या पूर्व बुर्द्धमान जिल्ह्याच्या एका विद्यार्थिनीने हे सिद्ध केले आहे की, चष्मा खास असेल तर आपण मनोइच्छित दृश्य पाहू शकतो. इयत्ता 12वीत असलेल्या दिगंतिका बोस हिने एक अनोखा चष्मा बनविला आहे, ज्यामुळे आपण मान न वळवता पाठीमागील दृश्यदेखील पाहू शकतो. परंतु असे चष्मे प्रयोगात व प्रचलनात येण्यासाठी या चष्म्यांना चाचण्यांमधून जावे लागेल. मेमारी येथील व्हीएम इन्स्टिट्युटच्या युनिट 12ची विद्यार्थिनी दिगंतिका बोसने सांगितले की तिने आपल्या कल्पनाशक्तीने हा चष्मा तयार केला आहे.

हा चष्मा बनविण्यासाठी फक्त 100 रुपये खर्च आला. चष्म्याच्या दोन्ही लेन्स आजूबाजूला कमानीने जोडत दिगंतिकाने डोक्याच्या मागील दृश्य पाहण्यासाठी दोन अतिरिक्त लेन्स लावल्या आहेत. ज्याप्रमाणे गाड्यांमध्ये पुढील बाजूस मागील दृश्य पाहण्यासाठी ‘साईड मिरर’ लावलेले असतात.
असा काम करणार चष्मा

सामान्यपणे जेव्हा आपल्याला मागे पाहण्याची गरज असते, तेव्हा मान व शरीर दोन्ही मागच्या बाजूस वळवावे लागते. या चष्माच्या प्रयोग केल्यावर मान वळविण्याची गरज लागणार नाही व मागे न वळता हालचाली पाहता येऊ शकणार आहे. खासकरून जंगल क्षेत्रातून जाताना आपण या चष्म्याच्या मदतीने जंगली प्राण्यांवर नजर ठेवू शकतो. दिगंतिकाने या चष्म्यात बहिर्गोल आरश्याचा उपयोग केला आहे. या आरश्याचा वरचा भाग परावर्तन पृष्ठभागाचे काम करतो, ज्याच्या आतील बाजूस पॉलिश केलेले असते. परावर्तन पृष्ठभागावर मागील दृश्य दिसतील.

क्लिपच्या माध्यमातून चष्म्याच्या दोन्ही बाजूस दोन वेगवेगळे लहान-लहान आरसे बनविण्यात आले आहे, जे कोणत्याही चष्म्याला वेगळे जोडले जाऊ शकतात. दिगंतिकानुसार, सामान्यपणे मानव आपल्या समोर व डाव्या-उजव्या बाजूस 124 अंशाच्या कोनातून पाहू शकतो. डोळ्यातील रेटिनाची हालचाल वाढवून व शरीराला थोडे वळवून आणखी जास्त पाहिले जाऊ शकते. आरश्यावर फोकस कमी असतो. यासाठी डोळ्यांपासून दीड इंचाच्या अंतरावर चष्म्यात यास फिक्स करण्याची व्यवस्था केली आहे.