ayodhya lights

राममंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर, या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट दहशतवादी आखत होते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या तपासातही समोर आली होती. यासाठी अल कायदाचे मॉड्युल कार्यरत झाले होते. नव्या तरुणांना संघटनेत सामील करुन, आत्मघाती हल्ल्यासाठी टीमही तयार करण्यात आली होती. कमी पैशांत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते.

  लखनौ : अयोध्येत उभारणी होत असलेल्या राम जन्मभूमी परिसरात राममंदिर उभारणीच्या ठिकाणी आत्मघाती हल्ला करण्याचा कट उघडकीस आला आहे. उ. प्रदेशाची राजधानी लखनौत रविवारी अटक करण्याक आलेल्या अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीत एटीएसला ही मोठी माहिती मिळाली आहे. अल कायदाच्या अलकायदा हिंद या संघटनेचे मिनहाज अहमद आणि मसीरुद्दीन उर्फ मुशीरला एटीएसने १४ दिवसांसाठी रिमांडवर घेतले आहे.

  राममंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर, या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट दहशतवादी आखत होते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या तपासातही समोर आली होती. यासाठी अल कायदाचे मॉड्युल कार्यरत झाले होते. नव्या तरुणांना संघटनेत सामील करुन, आत्मघाती हल्ल्यासाठी टीमही तयार करण्यात आली होती. कमी पैशांत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते.

  या टीममध्ये सामील असलेल्या सात जणांनी दोन वर्षांपूर्वी अयोध्येत मोटारसाकलवर फिरुन राम जन्मभूमीची रेकीही केली होती, ही माहितीही समोर आली आहे. एटीएसने सोमवारी दुपारी या दोन्ही दहशतवाद्यांना विशेष कोर्टासमोर हजर केले, आणि त्यानंतर त्यांना १४ दिवसांसाठी एटेस कोठडी देण्यात आली आहे.

  दहशतवाद्यांचा कमांडर शकील फरार

  मिनहाज आणि मसीरुद्दीन यांच्या चौकशीत एटीएसला कटाचे मोठे घबाड हाती लागले आहे. उ. प्रदेशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारी अल कायदा असल्याचे समोर आले आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी मानवी बॉम्बच्या सहाय्याने साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत हे दोघे होते, असा दावाही एटीएसने केला आहे. या दोघांनाही कमांडर शकील हा सूचला देत असल्याचेही उघड झाले आहे.
  या दोघांच्या चौकशीनंतर गेल्या २४ तासांत लखनौ, कानपूर, मेरठ, देवबंद या ठिकाणी छापेमारी केली असून २३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण स्लिपिंग सेलमध्ये कार्य़रत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तर एकट्या कानपूरमध्ये सहा जणांना अटक करण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी हे सर्व जण या दोन्ही दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोटासाठी मदत करणार होते, अशी माहिती एटीएसकडे आहे.