राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत
राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत

राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांनी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त संबोधित करताना संघ-भाजपावर तोफ डागली. जे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत तेच विचार भाजपाचे आहेत असे ते म्हणाले. न्यायपालिका, सीबीआय, आयकर विभागावर प्रचंड दबाव असून कोणाकडे धाड टाकण्याची याची यादी पंतप्रधान कार्यालयाकडूनच त्यांना प्राप्त होते, असा आरोपही त्यांनी केला. गृहमंत्री अमित शाह तर सरदार पटेल होऊ इच्छित असून देशाची स्थिती गंभीर होत असल्याकडे त्यांनी वेधले. परंतु आमची संस्कृती वेगळी आहे व हृदयही मोठे आहे. आम्ही शत्रू कधीच बाळगत नाही. गेल्यावेळी आम्हाला किती त्रास देण्यात आला परंतु आम्ही शत्रुत्व उराशी न बाळगता चागंले काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गहलोत म्हणाले.

जयपूर (Jaipur). राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांनी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त संबोधित करताना संघ-भाजपावर तोफ डागली. जे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत तेच विचार भाजपाचे आहेत असे ते म्हणाले. न्यायपालिका, सीबीआय, आयकर विभागावर प्रचंड दबाव असून कोणाकडे धाड टाकण्याची याची यादी पंतप्रधान कार्यालयाकडूनच त्यांना प्राप्त होते, असा आरोपही त्यांनी केला. गृहमंत्री अमित शाह तर सरदार पटेल होऊ इच्छित असून देशाची स्थिती गंभीर होत असल्याकडे त्यांनी वेधले. परंतु आमची संस्कृती वेगळी आहे व हृदयही मोठे आहे. आम्ही शत्रू कधीच बाळगत नाही. गेल्यावेळी आम्हाला किती त्रास देण्यात आला परंतु आम्ही शत्रुत्व उराशी न बाळगता चागंले काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गहलोत म्हणाले.

राज्यपालांवरही टीका
शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना गहलोत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही केंद्रीय कायद्यांविरोधात तीन कायदे पारित केले. ते राज्यपालांकडे प्रलंबित आहेत. त्यांनी ते अद्यापही राष्ट्रपतींकडे पाठविलेच नाही असे गहलोत म्हणाले. भाजपाच्या या भूमिकेमुळेच शेतकऱ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला असून ते आंदोलन करीत आहे, असे गहलोत म्हणाले. जर सरकारने या कायद्यांवर संसदेत चर्चा केली असती व निवड समितीकडे पाठविले असले तर विश्वास कायम राहिला असता असे गहलोत म्हणाले.

कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त (The corona devastated the economy)
लॉकडाऊन व कोरोनामुळे देश तसेच राज्याची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली असे गहलोत यावेळी म्हणाले. संकटाच्या या काळात केंद्र सरकारने राज्य सरकारांची मदत करायला हवी होती कारण खरी लढाई तर राज्य सरकारच लढतात, असे गहलोत म्हणाले. महसूल प्राप्ती मोठे आ्वहान असून राज्य सरकारला आता अर्थसंकल्पातील लक्ष्य बदलवण्यास भाग पडत आहे असे गहलोत म्हणाले.