The train station itself collapsed on the platform; Strange accident at Chandni station in Madhya Pradesh

मध्य प्रदेशमधील हुरहानपूरमध्ये एक विचित्र दुर्घटना घडली. वेगाने जाणाऱ्या ट्रेनमुळे हादरा बसल्याने रेल्वे स्थानकाची संपूर्ण इमारतच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना नेपानगर ते असीगढदरम्यान घडली. पुष्पक एक्सप्रेस ट्रेन ताशी 110 किलोमीटर वेगाने रेल्वेस्थानकामधून गेली. त्यानंतर ही ट्रेन जंगली भागामध्ये असणाऱ्या चांदनी रेल्वेस्थानकासमोरून त्याच वेगाने जात असताना चांदनी रेल्वेस्थानकाची इमारत ट्रेनच्या वेगामुळे निर्माण झालेल्या हादऱ्याने काही क्षणांमध्ये कोसळली.

    भोपाळ : मध्य प्रदेशमधील हुरहानपूरमध्ये एक विचित्र दुर्घटना घडली. वेगाने जाणाऱ्या ट्रेनमुळे हादरा बसल्याने रेल्वे स्थानकाची संपूर्ण इमारतच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना नेपानगर ते असीगढदरम्यान घडली. पुष्पक एक्सप्रेस ट्रेन ताशी 110 किलोमीटर वेगाने रेल्वेस्थानकामधून गेली. त्यानंतर ही ट्रेन जंगली भागामध्ये असणाऱ्या चांदनी रेल्वेस्थानकासमोरून त्याच वेगाने जात असताना चांदनी रेल्वेस्थानकाची इमारत ट्रेनच्या वेगामुळे निर्माण झालेल्या हादऱ्याने काही क्षणांमध्ये कोसळली.

    रूळांना लागून असणारा इमारतीचा प्लॅटफॉर्मकडील भाग प्लॅटफॉर्मवर कोसळला. 110 किमी वेगाने गेलेल्या ट्रेनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हादरा बसला की स्थानक अधीक्षक कक्षाच्या खिडकांच्या काचा फुटल्या. रेल्वे स्थानकातील बोर्ड खाली पडले आणि क्षणभरामध्ये लॅटफॉर्मवर इमारतीच्या अवशेषांचा ढीगारा पडला. या ठिकाणी गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी तैनात असणारे एएसएम प्रदीप कुमार यांनी स्वत:च्या डोळ्यादेखत हा सारा प्रकार पाहिला. इमारत पडू लागल्याचे लक्षात आल्यानंतर कुमार यांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली.

    कुमार यांनी तातडीने भुसावळ एडीआरएम मनोज सिंहा, खंडवा एडीएन अजय सिंह आणि वरिष्ठ डीएन राजेश चिकळे यांना यासंदर्भातील माहिती दिली. माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि नक्की काय घडले याची माहिती घेतली. याठिकाणी भुसावळ, खंडवा, बुरहानपुरच्या आरपीएफ आणि जीआरपी जवानांना तैनात करण्यात आले. या घटनेनंतर पुष्पक एक्सप्रेसला एक तास थांबवून ठेवण्यात आले. इतर गाड्यांचे वेळापत्रकही यामुळे कोलमडले आणि गाड्या 30 मिनिटे उशिराने धावत होत्या.