hathras gang rape

आग्रा येथील फॉरेन्सिक रिपोर्टनंतर मेडिकल कॉलेजने पीडित मुलीवर बलात्काराचे कोणतेही संकेत मिळण्यास नकार दिला. या पूुर्वी २२ सप्टेंबर रोजी पीडितेच्या मेडिकोलीगल (MLC) अन्वेषण अहवालात पीडित मुलीवर जबरदस्तीची चिन्हे दर्शविली गेली.

हाथरस : हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras rape case) प्रकरणात अलीगड मेडिकल कॉलेजने (जेएनएमसी) आपला अंतिम अहवाल (Hathras rape case final report) जाहीर केला आहे. आग्रा येथील फॉरेन्सिक रिपोर्टनंतर मेडिकल कॉलेजने पीडित मुलीवर बलात्काराचे कोणतेही संकेत मिळण्यास नकार दिला. या पूुर्वी २२ सप्टेंबर रोजी पीडितेच्या मेडिकोलीगल (MLC) अन्वेषण अहवालात पीडित मुलीवर जबरदस्तीची चिन्हे दर्शविली गेली. जरी बलात्काराची पुष्टी झालेली नाही. यासाठी केवळ फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा होती.

मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाने जाहीर केलेल्या अंतिम अहवालात असे म्हटले आहे की, “फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे अंतिम मत खालीलप्रमाणे आहे.
कोणत्याही प्रकारचे योनी किंवा गुदद्वारासंबंधित लैंगिक संबंध झाल्याचे संकेत नाही.”(Sexual Intercourse)
शारीरिक दोष असल्याचा पुरावा आहे (मान आणि पाठीला दुखापत आहे).

 rape case final report

पीडितेच्या एमएलसीच्या अहवालात जबरदस्ती झाल्याचे उघड

२२ सप्टेंबरला मेडिकल कॉलेजच्या फॉरेंसिक तज्ञांनी पीडितेच्या मेडिकोलीगल अहवाल सादर केला होता. डॉक्टरांनी अहवालात ओपिनियन कॉलममध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या अंदाजानुसार असे दिसते की पीडितेवर बळ जबरी केल्याची चिन्हे दिसत आहेत. तथापि, पिनिट्रेशन आणि इंटरकोर्ससंबंधीचा दृष्टीकोन एफएसएल अहवालाच्या प्रलंबित उपलब्धतेच्या अधीन आहे. ‘

वैद्यकीय महाविद्यालयाने यापूर्वी मत सुरक्षित ठेवले

रुग्णालयाने योनीतील पिनिट्रेशन (योनीत लिंग प्रवेश) प्रकरणात रुग्णालयाने आपले मत सुरक्षित ठेवलो होते. आणि सदर प्रकरण शासकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रोटोकॉलनुसार, “लैंगिक अत्याचाराने पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीत डॉक्टर लैंगिक गुन्ह्यास नाकारू शकत नाहीत किंवा पुष्टीही करत ​​नाहीत”. २२ सप्टेंबर रोजी पीडित मुलीने दंडाधिकाऱ्यांसमोर एक निवेदन नोंदविले ज्यात तिने आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगितले.

फॉरेन्सिक लॅब अहवालात रेप न झाल्याचे सांगितले

जबाब घेतल्यानंतर पीडितेचे नमुने आग्रा येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. १ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रशांत कुमार यांनी हथरस १९ वर्षीय दलित मुलीवर बलात्कार केल्याचा दावा केला नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, फॉरेन्सिक अहवालात मुलीच्या नमुन्यात शुक्राणू आढळले नाहीत. किंबहुना, आग्राच्या एफएसएलने म्हटले होते की, अहवालात हा सीमेन (शुक्राणू) सापडला नाही. या अहवालाच्या आधारे एडीजीने वक्तव्य केले होते.