पत्नी अनोळखी व्यक्तीसोबत फोनवर बोलली; शिक्षकानं महिलेसह मुलींवर हल्ला करत स्वतःला पेटवून घेतलं

अनोळखी व्यक्तीसोबत फोनवर बोलणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये घडली आहे. इथं एका शिक्षकानं आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींवर चाकूनं वारं (Attack) केला आहे.

    भोपाळ (Bhopal).  अनोळखी व्यक्तीसोबत फोनवर बोलणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये घडली आहे. इथं एका शिक्षकानं आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींवर चाकूनं वारं (Attack) केला आहे. इतकंच नाही तर गळा दाबून त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला आहे. यानंतर रॉकेल ओतून स्वतःलाही पेटवून घेतलं आहे.

    संबंधित शिक्षक हा अशोकनगरमधील मुंगावली येथे काम करतो. तर त्याची पत्नी मुंगावलीमधील एका रुग्णालयात नर्स आहे. शिक्षकाचा असा आरोप आहे, की त्याची पत्नी सहा – सहा तास फोनवर कोणाशी तरी बोलत असायची. याच मुद्द्यावरुन त्यांच्यात वादही सुरू होता. शिक्षकानं याशिवाय काही लोकांवरही आरोप केला आहे, की त्याच्या पत्नीला ते चुकीच्या मार्गावर घेऊन जात होते.

    आरोपी शिक्षकानं भाज्या कापण्याच्या चाकूनं हा हल्ला केला. सोबतच पत्नीची सहकारी नर्स, वनविभागात पदस्थ असणारी एक तरुणी आणि अन्य दोघांवर पत्नीला चुकीच्या मार्गावर घेऊन गेल्याचा आरोप केला. आरोपी सकाळी आपल्या मोठ्या मुलीला कोचिंगसाठी सोडून घरी आला आणि घरी येऊन त्यानं आपल्या पत्नीसह दोन निष्पाप मुलींवरही चाकूनं हल्ला केला. यातील एक मुलगी 3 वर्षांची तर दुसरी 12 वर्षांची आहे. आरोपीनं मुलींचा गळा दाबल्यानंतर पत्नीच्या गळ्यावर वार करत स्वतःला आग लावून घेतली, यात त्याचं 60 टक्के शरीर जखमी झालं आहे.