प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

उत्‍तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये मुख्‍यमंत्री सामूहिक विवाह योजनेतंर्गत आयोजित एका विवाह सोहळ्यात आई आणि मुलगी दोन्ही नववधू बनल्या. मुलगी इंदुचा विवाह तरुण राहुल याच्याशी झाला, तर 53 वर्षीय आई बेलादेवी यांनी आपल्या 55 वर्षाच्या अविवाहित दीर जगदीशसोबत लग्न केले. बेला आणि जगदीश यांचे लग्न सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

गोरखपूर (Gorakhpur).  उत्‍तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये मुख्‍यमंत्री सामूहिक विवाह योजनेतंर्गत आयोजित एका विवाह सोहळ्यात आई आणि मुलगी दोन्ही नववधू बनल्या. मुलगी इंदुचा विवाह तरुण राहुल याच्याशी झाला, तर 53 वर्षीय आई बेलादेवी यांनी आपल्या 55 वर्षाच्या अविवाहित दीर जगदीशसोबत लग्न केले. बेला आणि जगदीश यांचे लग्न सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.

सामूहिक विवाह सोहळ्यात ६८ जोडपे अडकले विवाह बंधनात
(68 couples caught in mass marriage ceremony)
— गोरखपूर येथील पिपरौली ब्‍लॉकमध्ये आयोजित या सामूहिक विवाह कार्यक्रमात एकूण 63 जोडपे विवाह बंधनात अडकले. यामधून एक मुस्लीम जोडपेसुद्धा आहे. पिपरौली ब्लॉकच्याच कुरमौल गावचे 55 वर्षीय जगदीश तीन भावांमधून सर्वात लहान आहेत. ते गावातच शेतीची कामे करतात. ते अद्यापही अविवाहित होते. जवळपास 25 वर्षांपूर्वी त्यांचे मोठे भाऊ हरिहर यांचे निधन झाले. त्यांना 2 मुले आणि 3 मुली आहेत. जगदीशची वहिनी बेलादेवीने सर्व मुलांचे शिक्षण केले. त्यांनी 2 मुले आणि 2 मुलींचे लग्नही लावून दिले. तिसरी सर्वात छोटी मुलगी इंदूचे लग्न पिपरौली ब्लॉकमध्ये आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचे ठरले. याचबरोबर, बेला यांनीही आपल्या लग्नाबाबतत मोठा निर्णय घेतला.

सर्वसहमतीने घेतला निर्णय
मुलीचे लग्न ठरल्यानंतर बेलादेवी यांनी दीर जगदीशसोबत लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याला जगदीश यांनीही सहमती दर्शविली. दोघांनीही लग्न याबाबत त्यांनी मुले आणि गावकऱ्यांचाही सल्ला घेतला. त्यांच्या या निर्णयावर सर्वांनी सहमती दर्शविली. यानंतर बेला आणि जगदीश यांनी मुलगी इंदु आणि राहुलसोबत त्याच मंडपात लग्न केले. या अनोख्या लग्न सोहळ्याप्रसंगी बीडीओ डॉ. सीएस कुशवाहा, सत्यपाल सिंह, रमेश द्विवेदी, बृजेश यादव, रतन सिंह, सुनील पांडेय यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

गुडिया-इरफानचा झाला निकाह
मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात देईपार गावातील राहणारे सत्तार यांची मुलगी गुडिया हिचा एहसान यांचा मुलगा इरफानसोबत सर्वसंमतीने निकाह झाला. निकाहाच्या विधी मौलाना इरफान अहमद यांनी पूर्ण केल्या. यावेळी उपस्थित लोकांनी नवदाम्पत्यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.