भारत-चीनच्या नियंत्रण रेषेवरील फलकावरील ‘हे’ वाक्य वाढवतेय सैनिकांचे आत्मबल; जाणून घ्या काय आहे ते वाक्य?

भारत-चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यादरम्यानच या सीमेवरील एक फलक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फलकावर लिहलेले एक वाक्य भारतीय सैनिकांच्या निश्चयाचे तसेच जिद्दीचे दर्शन घडवून देणारे आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरवर एलएसीजवळील आयटीबीपीच्या मुख्य चौकीवर लावलेल्या फलकावर, आयुष्यभर मेंढरासारखे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगणे केंव्हाही चांगले, असे लिहिण्यात आले आहे. हे वाक्य भारताला गुलाम बनवणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीशी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या म्हैसूरचा राजा टीपू सुल्तानने स्वत:साठी म्हटले होते.

इटानगर (Etanagar). भारत-चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यादरम्यानच या सीमेवरील एक फलक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फलकावर लिहलेले एक वाक्य भारतीय सैनिकांच्या निश्चयाचे तसेच जिद्दीचे दर्शन घडवून देणारे आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरवर एलएसीजवळील आयटीबीपीच्या मुख्य चौकीवर लावलेल्या फलकावर, आयुष्यभर मेंढरासारखे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगणे केंव्हाही चांगले, असे लिहिण्यात आले आहे. हे वाक्य भारताला गुलाम बनवणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीशी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या म्हैसूरचा राजा टीपू सुल्तानने स्वत:साठी म्हटले होते.

आयटीबीपी जवान हाय अलर्टवर (ITBP jawan on high alert)
आयटीबीपीच्या चौकीवर लावलेला हा फलक तसा जुना आहे. मात्र चीनसोबतच्या प्राप्त तणावाच्या परिस्थितीत हे वाक्य भारतीय सैन्याच्या जिद्दीचे दर्शन घडवून देणारे आहे. एलएसीजवळ गेल्या 7 महिन्यांपासून भारतीय सैनिक निर्धाराने सीमेचे रक्षण करत आहेत. तसेच ते चीनच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही सैनिकांचा निश्चय आणि उत्साह कमी झाला नाही.

सध्या भारत आणि चीनदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू आहे. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सैन्य पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत अडचणी येत आहेत. अरुणाचलच्या तवांगमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस दलातील जवान (आयटीबीपी) तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.