The world falls apart because it doesn't look like it! Garbage collector speaks fluent English

या महिलेच्या मते त्यांनी जपानमध्ये 7 वर्ष काम केले आहे. या व्हीडिओनुसार, महिला सदाशिवनगरच्या जवळ कचरा वेचत होती. ती पुढे सांगते की सात वर्षानंतर ती भारतात परतली. यासोबतच हे सर्व सांगताना महिला एक गाणेही म्हणते. महिलेने आपले नाव सेसिलिया मार्गारेट लॉरेन्स असल्याचे सांगितले.

    बंगळुरू :  एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल एखादे मत तयार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे समोरच्याचा रंग, रूप आणि कपडे पाहून कधीही आपण गैरसमज करून घेणे टाळले पाहिजे. सध्या याचाच प्रत्यय देणारा बंगळुरू येथील एका महिलेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ही महिला कचरा गोळा करते. मात्र, आता तिचाच जबरदस्त इंग्लिश बोलतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

    व्हीडिओमध्ये एक महिला दिसते, या महिलेच्या मते त्यांनी जपानमध्ये 7 वर्ष काम केले आहे. या व्हीडिओनुसार, महिला सदाशिवनगरच्या जवळ कचरा वेचत होती. ती पुढे सांगते की सात वर्षानंतर ती भारतात परतली. यासोबतच हे सर्व सांगताना महिला एक गाणेही म्हणते. महिलेने आपले नाव सेसिलिया मार्गारेट लॉरेन्स असल्याचे सांगितले. अनेकांनी यावर कमेंट करत लिहिले, की या महिलेचा व्हीडिओ रेकॉर्ड करून खूप चांगले काम केले.