yula kunda

श्री कृष्ण मंदिर येथे पोहचण्यासाठी शिमलापासून १९४ कि.मी किन्नौरमधील टापरी येथे पोहचल्यावर ३ किमीचा पायी प्रवास करुन बेस कॅम्प येथे पोहचावे लागते. यानंतर तेथून पुन्हा पायी, ट्रॅकींग करत मंदिराजवळ पोहचावे लागते.

हिमाचल प्रदेश : जगातील सर्वात उंचीवर ( world’s tallest ) असलेले श्री कृष्णाचे मंदीर (Sri Krishna temple ) भारतातील हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरच्या रोराघाटीमध्ये असलेल्या युला कुंड तलावाच्या मध्यभागी हे मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून १२ हजार फूट उंचीवर हे मंदिर आहे. तसेच राज्यातील सर्वाच प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हिमवृष्टीमुळे तलाव पूर्ण गोठला आहे. सर्वत्र बर्फाचे डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे हे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

yula kunda

शिमलापासून १९४ कि.मी अंतरावर आहे मंदिर

श्री कृष्ण मंदिर येथे पोहचण्यासाठी शिमलापासून १९४ कि.मी किन्नौरमधील टापरी येथे पोहचल्यावर ३ किमीचा पायी प्रवास करुन बेस कॅम्प येथे पोहचावे लागते. यानंतर तेथून पुन्हा पायी, ट्रॅकींग करत मंदिराजवळ पोहचावे लागते. हिमवृष्टीमुळे श्री कृष्णाचे मंदिर पुढील काही महिने बंद ठेवण्यात आले आहे. असे असूनही गीर्यारोहक या मंदिराजवळ जात आहेत.

तलावाच्या पाण्यात आहेत औषधी गुणधर्म

मंदिराच्या सभोवतालच्या तळ्याबाबत असा विश्वास आहे की, पांडवांनी वनवासात तलावाचे बांधकाम केले आहे. यानंतर मध्यभागी कृष्ण मंदिर बाधले आहे. या मंदिराला जास्त प्रसिद्धी नसल्यामुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये फारसे लोकप्रियता दिसून येत नाही. परंतू कृष्ण जन्माष्टमीला स्थानिक भाविक मोठ्या संख्येने येथे पोहचतात. मंदिरातील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या तलावाचे पाणी औषधी गुणांनी भरलेले आहे. असा दावा केला जात आहे.

जन्माष्टमीच्या दिवशी येथे भाविक आपल्या टोप्या उलट्या करुन तलावामद्ये ठेवतात. असे मानले जातात की, जर आपली टोपी बुडल्याशिवाय दुसऱ्या टोकाला पोहचली तर आपल्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.