The young man climbed the mobile tower; Police carried out an abandonment operation to save him

मोबाइल टॉवरवर उभ्या असलेल्या तरुणाला पाहून लोक हैराण झाले आणि त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागले होते. पण अखेर त्यांना हार मानून पोलिसांना बोलवावे लागले. त्यानंतर पोलिस अधिकारी काही पोलिसांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनंतर तरुण खाली येण्यासाठी तयार झाला. पोलिस अधिकारी सुरेंद्र लोधी आणि गोविंद मीणाला बोलविण्यात आले. दोघांना समोसे-कचोरी घेऊन टॉवरवर चढविण्यात आले.

    भोपाळ : मध्यप्रदेशच्या रायसेन जिल्ह्यात एक विक्षिप्त तरुण मोबाईल टॉवरवर चढला होता. इतकेच नाही तर टॉवर चढून डान्स करत तर शक्तिमानची नक्कलही करत होता. तिथे उपस्थित लोकांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकला नाही. अखेर पोलिसांनी त्याला समोसे आणि कचोरीचे आमिष दिले. तेव्हा तो खाली उतरला. जिल्ह्यातील सुल्तानगंजमध्ये विक्षिप्त टॉवरवर चढून डान्स करू लागला आणि काही वेळाने शक्तिमानची नक्कर करू लागला होता.

    मोबाइल टॉवरवर उभ्या असलेल्या तरुणाला पाहून लोक हैराण झाले आणि त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागले होते. पण अखेर त्यांना हार मानून पोलिसांना बोलवावे लागले. त्यानंतर पोलिस अधिकारी काही पोलिसांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनंतर तरुण खाली येण्यासाठी तयार झाला. पोलिस अधिकारी सुरेंद्र लोधी आणि गोविंद मीणाला बोलविण्यात आले. दोघांना समोसे-कचोरी घेऊन टॉवरवर चढविण्यात आले.

    नाश्त्याचे आमिष दिल्यावर तरुण खाली उतरण्यास तयार झाला. नंतर त्याला गोष्टींमध्ये गुंतवून खाली उतरविण्यात आले. तरुण खाली आल्यावर खाली उपस्थित लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. असे सांगितले गेले की, तरुण मानसिक रुग्ण आहे. तो नेहमीच अशाप्रकारची विचित्र कामे करत असतो.