तरुणाने चक्क ‘या’ कारणामुळे केली २ महिला आणि मुलीची हत्या

  • गुजरातमधील ढोलका शहरात शुक्रवारी संध्याकाळी तरुणाने लग्न ठरत नसल्याच्या संतापाने २ महिलांचा आणि मुलीची हत्या केली आहे. तरुणाचे नाव राजूभाई पटेल आहे. या तरुणाचे वय होऊनही लग्न ठरत नसल्यामुळे संतापला होता. संतापाच्या भरात त्याने शेजारील घरात जात २ महिला आणि १ लहान मुलीचा खुन केला आहे.

गुजरात – कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे देशात मार्च २०२० पासून लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊन काळात सर्व नागरिक घरीच असल्यामुळे नैराश्यात अडकले आहेत. अनेक जणांनी यामुळे आपले आयुष्य संपवले आहे. तसेच काहींनी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केली आहे. परंतु गुजरातमध्ये तरुणाने लग्न ठरत नसल्यामुळे २ महिलांचा आणि १ लहान मुलीची हत्या केली आहे. 

गुजरातमधील ढोलका शहरात शुक्रवारी संध्याकाळी तरुणाने लग्न ठरत नसल्याच्या संतापाने २ महिलांचा आणि मुलीची हत्या केली आहे. तरुणाचे नाव राजूभाई पटेल आहे. या तरुणाचे वय होऊनही लग्न ठरत नसल्यामुळे संतापला होता. संतापाच्या भरात त्याने शेजारील घरात जात २ महिला आणि १ लहान मुलीचा खुन केला आहे. यामध्ये जशोदाबेन पटेल (७५) सून सुमित्रा आणि तिची ७ वर्षांच्या मुलीची हत्या झाली आहे. या तिघांची हत्या केल्यानंतर आरोपी दुसऱ्या महिलेला मारायाल जात होता. त्याला गावकऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यास शेतीच्या आवजारांनी त्यांच्यावर हल्ला करत होता. लांब उभ्या असलेल्या २ महिलांकडे तो रागाने बघत बाय़ांना ठार मारणार असा आरोळ्या मारत मारण्यास जात होता. 

थोड्या वेळाने गावकाऱ्यांना आरोपीस पकडण्यात यश आले. गावकाऱ्यांनी तात्काळ पोलीसांना बोलविले आणि आरोपीस ताब्यात दिले आहे. आरोपी हा तिथेच राहणारा आहे. आरोपी त्याच्या अविवाहित भाऊ आणि वयोवृद्ध आई त्याच परिसरात राहतात. लग्न ठरत नसल्याच्या संताप अनावर झाल्याने शेतीच्या अवजार घेऊन त्याने हत्या केली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ताब्यात घेतले आहे. महिलांची हत्या करण्याचे कारण शोधत आहोत. परंतु तपासादरम्यान लग्न होत नसल्याने आरोपीने महिलांवर हल्ला केल्याचे कबूल केले आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.