ज्योतिरादित्य शिंदेंच्या महालात झाली चोरी, कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना चोरटे आले कसे हा विचार करताना पोलीस पडले बुचकळ्यात

खासदार ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya shinde)यांच्या जय विलास पॅलेसमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरी झाल्याचा(theft in jyotiradtya shinde`s palace) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या पॅलेसमध्ये चोरी झाल्याने पोलीस धास्तावले आहेत.

    दिल्ली: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरचे भाजपाचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya shinde)यांच्या जय विलास पॅलेसमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही चोरी झाल्याचा(theft in jyotiradtya shinde`s palace) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या पॅलेसमध्ये चोरी झाल्याने पोलीस धास्तावले आहेत.

    घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक टीम पॅलेसमध्ये दाखल झाली असून चोरी झालेल्या भागातील हातांचे ठसे आणि पुरावे गोळा केले आहेत. याशिवाय श्वानाचीही मदत घेतली जात आहे. सध्यातरी चोरटे येथून काय चोरी केले आणि कितीचा ऐवज लंपास केला हे समजू शकले नाही. ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेरच्या प्रवासदरम्यान परिवारासोबत याच महालात राहतात. हा पॅलेस चारही बाजूंनी सुरक्षारक्षकांनी वेढलेला असतो. यामुळे येथे चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.