face mask selling in nagpur

विनामास्क आढळल्यास संबंधितांची थेट खुल्या कारागृहात रवानगी होणार आहे. यासोबतच्या त्या व्यक्तीला कोरोना महामारीवर निंबध लिहावा लागणार आहे.

मध्य प्रदेश : कोरोनाची दुसरी लाट येईल अशी स्थिती सध्या भारतात निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणा याचा सामना करण्यासाठी सतर्क असल्यातरी नागरीक मात्र, सरकारने घातलेल्या खबरदारी नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. या विषयावर चिंता व्यक्त करत गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात मास्क न वापरता कोणी आढळून आल्यास त्याला अनोखी शिक्षा करण्यात येणार आहे.

विनामास्क आढळल्यास संबंधितांची थेट खुल्या कारागृहात रवानगी होणार आहे. यासोबतच्या त्या व्यक्तीला कोरोना महामारीवर निंबध लिहावा लागणार आहे.

ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष अभियान राबवले आहे. कोरोना विषयक जनजागृती करण्यासोबतच विनामास्क आढळणाऱ्यांची रवानगी थेट खुल्या कारागृहात केली जाणार आहे.

शनिवारी 20 नागरिकांना रुपसिंह स्टेडियममधील खुल्या तुरुंगात पाठवण्यात आलं, त्यांच्याकडून कोरोनाविषयी निबंध लिहून घेण्यात आला.

दरम्यान, जे लोक करोना नियमांचा भंग करत आहेत, त्यांना कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी. दिवसांतून चार ते पाच तास त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावं, असे आदेश यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.