कमल हसन यांचा पक्ष आणि रजनीकांत यांच्या पक्षात युती होणार असल्याचीही राज्यात चर्चा आहे. तथापि कमल हसन यांनी मात्र या मुद्यावरही मौन साधले आहे. या महिनाअखेरीस रजनीकांतही राजकीय पक्षाची घोषणा करणा आहेत. रजनीकांत यांच्या पक्षासोबत युती करण्याच्या मुद्यावर तूर्तास तरी कमल हसन यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. या मुद्यावर आतचा बोलण्याची ही वेळ नाही असे ते म्हणाले.
चेन्नई : पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांविषयी राजकीय चर्चांना ऊत आला आहे. कमल हसन यांच्या पक्षाने नुकतीच निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ते काही राजकीय पक्षासोबत युती करण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू झाली होती. तथापी कमल हसन यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
त्यांचा पक्ष मक्कल निधी मैयम आगामी विधानसभा निवडणुकीत कषगम पक्षांसोबत युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख द्रमुक आणि अद्रमुककडे होता.
रजनीकांतसोबत युती करण्यावर मौन
कमल हसन यांचा पक्ष आणि रजनीकांत यांच्या पक्षात युती होणार असल्याचीही राज्यात चर्चा आहे. तथापि कमल हसन यांनी मात्र या मुद्यावरही मौन साधले आहे. या महिनाअखेरीस रजनीकांतही राजकीय पक्षाची घोषणा करणा आहेत. रजनीकांत यांच्या पक्षासोबत युती करण्याच्या मुद्यावर तूर्तास तरी कमल हसन यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. या मुद्यावर आतचा बोलण्याची ही वेळ नाही असे ते म्हणाले.
तामिळनाडूतील कषगम पक्ष
कमल हासन यांच्या या घोषणेनंतर त्यांचा पक्ष द्रमुक-अद्रमुकसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कषगकम पक्षांमध्ये प्रामुख्याने अम्मा मक्कल मुनेत्र कषगम, द्रविड कषगम, द्रविड़ विदुथलाई कषगम, मारुमरारची द्रविदा मुनेत्र कषगम, एमजीआर कषगम, देसिया मुरपोकु द्रविदा कषगम, धीरविदा थलुग्रर मुन्नेत्रम, दलगाम, डलहौदा, अ.भा. मुवेन्द्र मुन्नानी कषगम, कामराजार आदितानार कषगम, कोंगुनाडू मुनेत्र कषगम आणि मोवेन्द्रा मुनेत्र कषगम या पक्षांचा समावेश आहे.