There was something in the stomach of a one and a half year old boy that ... The doctor also trembled when he saw the X-ray report

लखनऊ : दीड वर्षाच्या मुलाच्या X-Ray रिपोर्ट मध्ये डॉक्टरांना असे काही दिसले की, रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले. उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला आहे.

लखनऊमधील दीड वर्षाच्या मुलानं ६५ मणी असलेला मोत्याचा हार गिळला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बालरोग तज्ज्ञांकडे धाव घेतली. यांनतर X-Ray रिपोर्ट मध्येही हा हार दिसला.

यामुळे हा मुलगा एकसारखा रडत आणि उलट्या करत होता. डॉक्टरांनवी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शस्त्रक्रिया सुरु असताना काही उपकरणे ओढली जाऊन एका ठिकाणी चिटकून राहत होती. त्यामुळे या मण्यांमध्ये चुंबकीय गुण असल्याने हे होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.

लहान आतड्यात आणि पोटाच्या मागील बाजूस डॉक्टरांनी एक छिद्र पडलं होतं. त्यानंतर पाच तास अथक प्रयत्न केल्यानंतर चुंबकीय गुणधर्म असलेले सर्व मणी काढण्यात डॉक्टरांना यश आले.