RSS

पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी (Pok Gilgit Baltistan To Get Out from Pakistan) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्न करणार आहे.  यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार(indresh kumar) यांनी मोहीम (Campaign Of Rss) सुरू केली आहे. 

दिल्ली : पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधून बाहेर काढण्यासाठी (Pok Gilgit Baltistan To Get Out from Pakistan) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्न करणार आहे.  यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार(indresh kumar) यांनी मोहीम (Campaign Of Rss) सुरू केली आहे.

जम्मू-काश्मीरमधे आर्टिकल ३७० पुन्हा लागू करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (mehbuba mufti) आणि फारुख अब्दुल्ला(farooq abdullah) यांनी चीनची मदत मागितली. त्यामुळे त्यांनी भारत सोडून पाकिस्तान आणि चीनमध्ये स्थायिक व्हावे असे इंद्रेश कुमार म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या परिषदेत कुमार बोलत होते.

“पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानसाठी आता आवाज उठविला जाईल. हे प्रदेश जम्मू-काश्मीरचाचं एक भाग होते आणि म्हणूनच त्यांना भारतात सामील करायला हवं. आजपासून पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधून पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात येणार असून पाकिस्तानने या ठिकाणाहून आपले सैन्य मागे घ्यावे”, असे कुमार म्हणाले.

भारतीय तिरंग्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यावरही कुमार यांनी टीका केली. जम्मू काश्मीर मधील लोकांनी मेहबूबा मुफ्ती यांना पाहिजे तिथे निघून जा असे सांगायला हवं असं कुमार म्हणाले.

केंद्र सरकारने ३७० कलम हटवल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तिथल्या नेत्यांना तुरूंगात टाकाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना वाईट वाटले नाही असा दावा गुपकर ठरावाबद्दल बोलताना कुमार यांनी केला.

“कुणीही संताप व्यक्त केला नाही, निषेध मोर्चे काढले नाहीत, त्यांच्या बाजूने आंदोलनं केली नाहीत. काश्मीर खोऱ्यामध्ये कुठेही बंद पाळण्यात आला नाही. त्याऐवजी ज्यांनी लोकांना लुटले ते तुरूंगात गेले याचा नागरिकांना आनंदच झाला असे कुमार म्हणाले.”७० वर्षानंतर आता भारत एक राष्ट्र झाला आहे. देशात एक राष्ट्र, एक ध्वज, एक संविधान, एक नागरिकत्व, एक घोषणा आणि एक राष्ट्रगीत आहे” असेही कुमार म्हणाले.