narendra modi

मोठ्या मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदींना भेटण्यासाठी रांगेत उभे असतात, असेही रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. ज्या पद्धतीने त्रेता आणि द्वापर युगामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता त्याचप्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदींना येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवेल, असे रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

    हरिद्वार : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्यांशी केली आहे. हरिद्वारमध्ये नेत्र कुंभाची सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने उधळली.

    याचवेळी त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा उंचावली असल्याचे सांगितले. आज अनेक मोठ्या मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदींना भेटण्यासाठी रांगेत उभे असतात, असेही रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. ज्या पद्धतीने त्रेता आणि द्वापर युगामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता त्याचप्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदींना येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवेल, असे रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

    एक काळ असा होता की देशाचे पंतप्रधान परदेशात जायचे तेव्हा त्यांना तिकडे कुणी विचारायचही नाही. आज मात्र भारताची परिस्थिती आणि गोष्टींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा इतर देशांचे राष्ट्रध्यक्ष त्यांची भेट घेण्यासाठी रांगेत उभे राहतात, असे रावत म्हणाले. सध्या रावत हे पौडी लोकसभा मतदारसंघामधून खासदार आहेत. जनतेचे काम करणारे लोकप्रितिनिधी म्हणून मोदींनी जनतेवर कधीही न पुसता येणारी छाप सोडल्याचं प्रशस्तीपत्रकही रावत यांनी मोदींना दिले.