…या माणसानं गाईचा केला तिरस्कार, अन् गाईनचं केला माणसाचा सत्कार ; पाहा व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गाईला हा माणूस मारत आहे. इतकंच नाही तर माणूस गाईला मारल्यानंतर तीची शेपटीसुद्धा पिळतो. ही शेपटी पिळल्यानंतर गाईला प्रचंड वेदना सुद्धा होतात. तसंच राग सुद्धा येतो. परंतु आपली सहनशक्ती संपल्यानंतर गाईने आपले दैवीरूप धारण करून या माणसाला चांगलीच अद्दल घडवली आहे.

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.., असं भावगीत तुम्ही ऐकलं असेलच. मुक्या प्राण्यांची सेवा करावी, त्यांना कधीही मारू नये, त्यांच्यावर प्रेम, करूणा, दया करावी. गाईला (Cow) हिंदू धर्मात देवता मानलं जातं. गाय कुठे रस्त्यात किंवा येता-जाताना दिसली की लोक नेहमीच तिला नमस्कार करतात. परंतु एका माणसाने गाईचा तिरस्कार केला असून गाईने त्या माणसाचा चांगलांच सत्कार केला आहे. गाईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये ?

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गाईला हा माणूस मारत आहे. इतकंच नाही तर माणूस गाईला मारल्यानंतर तीची शेपटीसुद्धा पिळतो. ही शेपटी पिळल्यानंतर गाईला प्रचंड वेदना सुद्धा होतात. तसंच राग सुद्धा येतो. परंतु आपली सहनशक्ती संपल्यानंतर गाईने आपले दैवीरूप धारण करून या माणसाला चांगलीच अद्दल घडवली आहे. परंतु हास्यात्मक म्हणजे गाईने या माणसाला धडा शिकवल्यानंतर त्या माणसाचं पुढं काय झाल असेल? याचा विचारही कोणी करू शकत नाही.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दाखल करायला हवी, असं अनेकांचे म्हणणे आहे. परंतु या गोष्टीतून त्या माणसाने एक धडा नक्कीच शिकला आहे. तो म्हणजे जसे करावे तसे भरावे…