This wait is dangerous; As many as 20 vehicles collided with each other due to thick fog, injuring 15 people

हिसार : राज्यासह देशात थंडीचा कहर वाढला आहे. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झल्याने हरयाणातील हिसार येथे विचित्र अपघात झाला.

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास दाट धुक्यामुळे समोरचे काही दिसत नसल्याने २० वाहनांची एकमेकांना धडक झाली. यात १५ जखमी झाले आहेत.

या अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका रुग्णवाहिकेचाही समावेश होता. याठिकाणी दृष्यमान ५० मीटरपेक्षाही कमी होते. दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या थंडीतही कडक्याची थंडी पडली आहे. येथे देखील धुक्यामुळे रस्त्यावरचे काही दिसत नसल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. वाहनांच्या हेड लाईट सुरु ठेवून वाहतूक करण्याच्या सूचना वाहनचालकांना करण्यात येत आहेत.