दगडफेकीत सहभागी होणाऱ्यांची खैर नाही; दंगेखोरांना पासपोर्ट-सरकारी नोकरी नाही

पासपोर्ट, सरकारी नोकरी तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पडताळणी दरम्यान व्यक्तीला कायदे-व्यवस्था उल्लंघन, दगडफेक प्रकरण तसेच राज्यात सुरक्षा दलांविरोधात इतर गुन्हेगारी स्वरूपातील कृत्यात सहभागाची विशेष चौकशी करण्याचे आदेश याद्वारे देण्यात आले आहेत. स्थानिक पोलीसत स्टेशनमध्ये उपलब्ध असलेल्या रेकॉर्डशी अशा प्रकरणांची पडताळणी करावी, असेही आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये यापुढे दगडफेकीत सहभागी होणाऱ्यांना आणि दंगेखोरांना पासपोर्ट तसेच सरकारी नोकरी मिळणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, दगडफेक तसेच धोकादायक कृत्यांत सहभागी होणाऱ्यांना पासपोर्ट आणि सरकारी नोकरीसाठी आवश्यक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळणार नाही. काश्मीरमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेच्या वरिष्ठ अधीक्षकांनी यासंबंधात आदेश जारी केले आहेत.

    पासपोर्ट, सरकारी नोकरी तसेच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पडताळणी दरम्यान व्यक्तीला कायदे-व्यवस्था उल्लंघन, दगडफेक प्रकरण तसेच राज्यात सुरक्षा दलांविरोधात इतर गुन्हेगारी स्वरूपातील कृत्यात सहभागाची विशेष चौकशी करण्याचे आदेश याद्वारे देण्यात आले आहेत. स्थानिक पोलीसत स्टेशनमध्ये उपलब्ध असलेल्या रेकॉर्डशी अशा प्रकरणांची पडताळणी करावी, असेही आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

    यासाठी व्यक्तीच्या पडताळणीसाठी पोलिस, सुरक्षादल आणि इतर सुरक्षा यंत्रणेजवळ उपस्थित असलेले डिजिटल पुरावे उदाहरणार्थ सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हीडिओ तसेच ऑडिओ क्लीपचीही मदत घेण्यात येणार आहे. पडताळणीत एखादा व्यक्ती दगडफेक किंवा दंगेखोरीत सहभागी आढळला तर त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.

    जम्मू-काश्मीर पोलिसांच्या या आदेशाचे राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले. केंद्रशासित प्रदेशातील सद्य प्रशासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी म्हटले. जम्मू-काश्मीरमध्ये काही राष्ट्रविरोधी ताकदी आहेत ज्या दहशतवाद आणि पाकिस्तानच्या समर्थक आहेत. देशाविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या आणि जबाबदारीतून पळ काढून परदेशात पळून जाणाऱ्यांसाठी हा मोठा झटका असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी म्हटले.