विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये घरवापसीचे वारे, भाजपचे तीन आमदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर?

भाजपाचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

    पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपला गळती लागली असून तृणमध्ये कॉंग्रेसमध्ये घरवापसीचे वारे वाहताना दिसत आहे. शुक्रवारी भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं भाजपाला मोठा झटका बसला आहे. इतकंच नाही, तर भाजपाला मोठे हादरे बसण्याची शक्यता आहे.

    भाजपाचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीकडे एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे चार जण तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

    विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. तृणमूल पुन्हा सत्तेत आल्याने निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले नेते परतीची पावलं टाकताना दिसत आहे.