knives

पिडित युवकाने आपल्या मित्राकडून एक लाख रुपये घेतले होते. पिडित तरुणाचे नाव समीर असून बागपत नगरमधील ईदगाहमध्ये वास्तव्यास आहे. समीरने परवेझकडून पैसे घेतले होते. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन वाद सुरु होते.

बागपत : युवकाच्या लग्नाच्या तीन दिवसआधीच (before the wedding)  मित्रांसोबत भांडण विकोपाला गेल्यामुळे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशातील बागपतमध्ये ही घटना घडली आहे. पैशांची देवाण-घेवाण करणे या तरुणाच्य अंगलट आले आहे. पैशांबाबतचा वाद इतका विकोपाला गेला की, या रागात युवकाच्या मित्रांनी लग्नाच्या तीन दिवस आधी  (Three days before the wedding) अपहरण करुन केले. त्याला जंगलात घेऊन गेले. पैशांची मागणी करत मारहाणही केली. यानंतर युवकाचे गुप्तांग कापून (young man’s genitals were cut off)  आरोपी घटनास्थळावरुन रफूचक्कर झाले. पिडित युवकाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे घटना

पिडित युवकाने आपल्या मित्राकडून एक लाख रुपये घेतले होते. पिडित तरुणाचे नाव समीर असून बागपत नगरमधील ईदगाहमध्ये वास्तव्यास आहे. समीरने परवेझकडून पैसे घेतले होते. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन वाद सुरु होते. अनेक वेळा परवेजने पैसे मागितल्यावर समीर टाळाटाळ करत होता. तसेच लग्नानंतर हा वाद मिटवू असे समीरने सांगितले होते.

परंतु लग्नाच्या तीनदिवसआधी परवेजचे २ मित्र आले होते. असे समीरने सांगितले. तो पुढे म्हणाला की, त्या दोघांनी आपल्याकडे पैशांची मागणी केली. आताच्या आता पैसे दे असे धमकावून बोलत होते. मी त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी मला जबरदस्तीने जंगलात नेले आणि बेदम मारहाणही केली असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी गुप्तांग कापले असल्याचे समीरने सांगितले आहे. नंतर मला जखमी अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. जखमी अवस्थेत असताना मी कसेबसे याबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर आपल्याला रुग्णालयात दाखल केले असेही समीरने तक्रार देताना म्हटले आहे.

युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरारी आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. युवकाच्या लग्नाच्या तीन दिवसआधीच गुप्तांग कापल्याने कुटुंबीयांमध्ये चिता वाढली आहे.