sky lightning

मऊतील तहसीलदार संजय अग्रहरी यांनी बुधवारी सांगितले की, "शेतात कंपोस्ट टाकून परतत असलेल्या मोहम्मद सुलतान (५०) या शेतकऱ्याचा मंगळवारी संध्याकाळी इटवान गावात वीज कोसळल्याने मृत्यू झाला. तर त्याची पाच वर्षांची नात शानू पोळली गेली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चित्रकूट : उत्तप्रदेशमधील  (Uttar Pradesh) चित्रकूटमध्ये वीज कोसळण्याच्या (sky lightning) वेगवेगळ्या घटनांमध्ये मंगळवारी तीन शेतकर्‍यांचा (farmers) मृत्यू (death) झाला, तर एका मुलीसह तीन जण पोळले गेले आहेत. या घटनांमध्ये पाच जनावरांचा मृत्यूही झाला आहे.

मऊतील तहसीलदार संजय अग्रहरी यांनी बुधवारी सांगितले की, शेतात कंपोस्ट टाकून परतत असलेल्या मोहम्मद सुलतान (५०) या शेतकऱ्याचा मंगळवारी संध्याकाळी इटवान गावात वीज कोसळल्याने मृत्यू झाला. तर त्याची पाच वर्षांची नात शानू पोळली गेली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मानिकपुरचे पोलीस निरीक्षक के.के. मिश्रा म्हणाले की, “गडचपा गावात शेतकरी विनीत कोल (वय ४५) हे शेताला खतपाणी घालून घरी परत येत असताना पावसात वीज पडून मृत्यू झाला.” त्याचप्रमाणे रपुरा भागातील लोधीहा माफी गावात वीज कोसळल्याने शेतकरी नत्थू प्रसाद (४७) यांचा मृत्यू झाला. वीज कोसळल्याने दोन म्हशींचाही मृत्यू झाला.