Had his wife not been shown the Taj Mahal, he would be alive today

दिल्लीतील आग्रा(agra) येथे असलेल्या ताजमहाल(tajmahal) येथे हिंदू महासभेच्या(hindu mahasabha workers arrested) काही पदाधिकाऱ्यांनी शिवपूजन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हिंदू संघटनेचे दोन कार्यकर्ते आणि एका महिला पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

    आग्रा: संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा(mahashivratri) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना (corona)संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे(social distancing) पालन करत भाविकांनी मंदिरांमध्ये जाऊन शिवदर्शन घेतले. अनेक ठिकाणी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, दिल्लीतील आग्रा येथे असलेल्या ताजमहाल येथे हिंदू महासभेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवपूजन केल्याचे समोर आले आहे.

    याप्रकरणी हिंदू संघटनेचे दोन कार्यकर्ते आणि एका महिला पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ताजमहाल येथे जाऊन हिंदू महासभेचे कार्यकर्त्यांनी पूजा आणि आरती केली. काही हिंदूत्ववादी संघटना ताजमहालला शिवस्थान मानतात. म्हणूनच महाशिवरात्रीच्या निमित्ताने ताजमहाल येथे जाऊन या कार्यकर्त्यांनी महादेव शिवशंकराची आराधना केली.

    सेंट्रल टँक येथील डायना बेंच येथे हिंदू महासभेच्या प्रांत अध्यक्षा मीना दिवाकर विधीपूर्वक आरती करू लागल्या. याच वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना अटक केली. यावेळी मीना दिवाकर यांच्यासोबत दोन कार्यकर्ते उपस्थित होते. मीना दिवाकर यांच्यासह दोन कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून या तीन जणांची चौकशी केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय जाट आणि जिल्हाध्यक्ष रौनक ठाकूर काही कार्यकर्त्यांसह दिल्लीतील ताजगंज पोलीस स्थानकात गेले.