मासेमारीला जाण्यासाठी विरोध केला, पत्नीला पेट्रोल ओतून जिवंत जाळलं

पत्नीने मासेमारीसाठी एकत्र जाण्यास नकार दिल्यानं पतीने तिला मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेली पीडित पत्नी अर्ध्याहून अधिक भाजल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली.

छिंदवाडा (Chindwada). पत्नीने मासेमारीसाठी एकत्र जाण्यास नकार दिल्यानं पतीने तिला मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेली पीडित पत्नी अर्ध्याहून अधिक भाजल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली.

छिंदवाडा इथल्या तामिया पोलीस ठाण्याच्या परिसरातील डेलखरी गावची ही खळबळजनक घटना आहे. नवा मोहल्ला येथे राहणारी बलि कहार याची पत्नी गोमतीबाईसोबत रात्री खूप वाद झाला आणि त्यावरून पतीच्या डोक्यात राग गेला. यांचा पत्नी गोमतीबाई कहार (४०) यांच्याशी वाद झाला. तो पत्नीबरोबर वादात भांडतही असे. मासेमारीवरून दोघांमध्ये गुरुवारी वाद झाला. पतीनं आपल्या पत्नीला एकत्र मासेमारीसाठी जाण्यास सांगितले असता तिने नकार दिला आणि त्यानंतर पतीनं हे टोकाचं उचललं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तिथे पोहोचले.

अर्ध्याहून अधिक भाजलेल्या अवस्थेत पत्नी तडफडत होती. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी आणि तपास सुरू आहे. पतीविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.